पिंपरी / चिंचवड

चिंचवड येथे चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी | प्रतिनिधी

बीजलीनगर येथे एका चार वर्षीय मुलीवर 16 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर सोमवारी (दि. 16) सकाळी नऊ ते दुपारी साडेपाच या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 16 वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सकाळी नऊ वाजता कामानिमित्त घराबाहेर गेल्या. त्यावेळी त्यांची चार वर्षीय मुलगी आणि मुलगा दोघे घरी होते. दुपारी साडेपाच वाजता फिर्यादी कामावरून घरी आल्या असता पीडित मुलीने तिला शरीराच्या ठराविक भागात वेदना होत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर आरोपी 16 वर्षीय मुलाने केलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीचा भाऊ घराबाहेर गेला असता आरोपीने हा प्रकार केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button