पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी चार आत्महत्या

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर परिसरात आत्महत्येच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. चिखली, भोसरी, मोशी आणि देहू येथे आत्महत्येच्या घटना रविवारी (दि. 9) उघडकीस आल्या.

आत्महत्येची पहिली घटना चिखली परिसरात घडली. शुभम हरदिास इंगळे (वय 19, रा. चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील असून शहरात तो मोलमजुरीचे काम करीत होता. शनिवारी रात्री त्याचा सहकारी जेवण करण्यासाठी गेला असता त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

आत्महत्येची दुसरी घटना भोसरी परिसरात घडली. सुपदाजी हरिभाऊ तायडे (वय 27, रा. सदगुरूनगर, भोसरी) यांनी शनिवारी सायंकाळी राहत्या घरात पंख्याच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांना दारूचे व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

आत्महत्येची तिसरी घटना मोशी परिसरात घडली. प्रशांत रखमाजी माटे (वय 43, रा. मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

आत्महत्येची चौथी घटना देहू येथे घडली. कल्पना निरंजन सरदार (वय 26, रा. देहूगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. कल्पना यांना दुर्धर आजार होता. या आजारपणाला कंटाळून त्यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button