breaking-newsताज्या घडामोडी

कोरोनाच्या भीतीने एकाच कुटुंबातील चार जणांनी प्यायलं विष, आई-मुलाचा मृत्यू

तामिळनाडू | प्रतिनिधी 

कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढतो आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटचे रूग्ण वाढत आहेत. अशात आता कोरोनाच्या धास्तीने एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्यायल्याची घटना घडली आहे. या घटनेत आई-मुलाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे यामध्ये वाचले आहेत. तामिळनाडूतील मदुराई या ठिकाणी ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्यायलं. या घटनेत आईचा आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या भीतीने चार जणांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील जीव देणाऱ्या महिलेचा भाऊ आणि तिच्या आईचा समावेश आहे. तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचा जीव वाचला आहे. मात्र या घटनेतील आई आणि मुलाचा जीव वाचू शकलेला नाही. मृत महिलेचा नाव ज्योतिका असं आहे. ती तिच्या पतीपासून वेगळी राहते. पीडित महिला ही तिच्या आई आणि भावासह माहेरीच राहात होती.

ज्योतिकाचे वडील नागराज यांचे डिसेंबर महिन्यात निधन झालं. त्यामुळे या कुटुंबावर आर्थिक दबाव होता. त्यात 8 जानेवारीला जोतिका कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली. ही माहिती जोतिकाने आईला दिली. यामुळे जोतिकाची आई घाबरली. त्यानंतर कोरोनाच्या दहशतीने कुटुंबातील सगळ्यांनी विष पिण्याचं टोकाचं पाऊल उचललं. या चौघांनीही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये ज्योतिका आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला.

शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी या चार सदस्यांना रूग्णालयात नेलं. त्यात दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. इतर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेनंतर तामिळनाडू सरकारने एक निवेदन जारी करत सामान्य जनतेला आवाहन केलं आहे की कोरोनामुळे, कोरोनाच्या संक्रमणामुळे कुणीही घाबरू नये. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. कोरोना संक्रमित झाला असाल तर डॉक्टरांना आणि रूग्णालयाशी संपर्क साधा. कोरोनावर उपचार शक्य आहेत कोरोनातून रूग्ण बरे होतात त्यामुळे घाबरून जाऊ नका असंही तामिळनाडू सरकारने सांगितलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button