breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

सर्वच जिल्ह्यांत आजपासून चार दिवस मुसळधार

पुणे – बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कालपासून या भागात गुलाब चक्रीवादळ घोंघावू लागले आहे.रविवारी संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ  दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनार्‍याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे क्षेत्र महाराष्ट्राकडे येण्याची चिन्हे आहेत.

या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रासह सर्वच जिल्ह्यांत रविवारपासून चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.चक्रीवादळ किनार्‍याला धडकताना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विजयनगरम, ओडिशातील गंजम या जिल्ह्यांच्या किनार्‍यालगतच्या सखल भागांत अर्धा मीटर उंचीच्या लाटा शिरण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा मार्ग पाहता रविवारी (दि. 26) किनार्‍याला धडकून उत्तर आंधजए प्रदेश, दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणातून सोमवारपर्यंत (दि. 27) महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाकडे येण्याचे संकेत आहेत. किनार्‍याला धडकल्यानंतर या वादळाची प्रणालीची तीवजएता कमी होत जाणार आहे. या काळात जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी (दि. 27) विदर्भ, मराठवाड्यात, तर मंगळवारी (दि. 28) कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button