पिंपरी / चिंचवड

खराबवाडी येथून सरकारी कामाचे पाईप चोरून नेणा-या चौघांना अटक : 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी l प्रतिनिधी

खराबवाडी वाघजाईनगर येथून पाण्याच्या टाकीपासून सरकारी पाईपलाईनचे पाईप चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर महाळुंगे पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख 35 हजारांचे पाईप जप्त केले आहेत.

अमोल अर्जुन गोरे (वय 2, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. शेळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), हनुमंता संगाप्पा कट्टीमणी (वय 32, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. कर्नाटक), आतिश राजाभाऊ कांबळे (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. घारगाव, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), सुंदर दोदाप्पा दोडमणी (वय 33, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक तीनचे शाखा अभियंता राजेश कुलकर्णी यांनी याबाबत महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खराबवाडी मधील वाघजाईनगर येथे पाण्याच्या पाईपलाईनसाठी पाईप आणून ते पाण्याच्या टाकीजवळ ठेवण्यात आले होते. 8 ते 10 एप्रिल या कालावधीत अज्ञातांनी 13 लाख 50 हजारांचे 120 पाईप चोरून नेल्याचा प्रकार घडला. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. तत्काळ आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून 10 लाख 35 हजारांचे 92 पाईप जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक किरण शिंदे, पोलीस हवालदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, पोलीस नाईक संतोष काळे, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, अमोल निघोट, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button