breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी आमदार विलास लांडे यांची एक ‘फाईट’… वातावरण ‘टाईट’ !

  • फ्लेक्सबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने
  • पालिकेच्या सभागृहात आयुक्तांवर जोरदार फटकेबाजी

पिंपरी / महाईन्यूज

शहरातील कष्टकरी वर्गाला 3 हजार रुपयांचे अमिष दाखवून सत्ताधा-यांनी त्यांची घोर फसवणूक केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कष्टक-यांना तीन हजाराचे गाजर दाखविणा-या सत्ताधा-यांचा बुरखा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांनी अक्षरषः फाडून टाकला. संपूर्ण शहरात फ्लेक्स लावून सर्वसामान्य नागरिकांना फसवण्याचा सत्ताधा-यांचा डाव लांडे यांनी उधळून लावला. त्याचे पडसाद आजच्या सर्वसाधारण सभेत उमटल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच गदारोळ झाला. लांडे यांनी सत्ताधा-यांचा बुरखा फाडल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ‘टाईट’ झाले आहे.

लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या कष्टक-यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने 3 हजार रुपये अर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेऊन पंधरा दिवस झाले… महिना उलटला तरी कष्टक-यांना आर्थिक लाभ मिळाला नाही. कष्टक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी माजी आमदार लांडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. तरी देखील आयुक्तांनी अर्थसहाय देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही. जर कायद्यात बसत नसेल तर असे निर्णय तुम्ही कशाला घेता ? कोणाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला ? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला का ? असा जाब त्यांना विचारण्यात आला. त्यावर कायद्यात बसत नसल्यामुळे हा लाभ देणे शक्य नसल्याचे उत्तर आयुक्तांकडून देण्यात आले. आयुक्तांच्या उत्तराने शहरातील साडेतीन लाखांहून अधिक कष्टक-यांची फसवणूक झाली. त्यावर लांडे यांनी प्रशासन आणि सत्ताधा-यांवर संताप व्यक्त करत पिंपरी-चिंचवडच्या कानाकोप-यात फ्लेक्स लावून 3 हजार रुपये देण्याच्या नावाखाली कष्टक-यांची होणारी फसवणूक उघडकीस आणली.

‘नागरिकांच्या पैशांवर सत्ताधा-यांची नजर… कष्टकरी जनतेला दाखविले 3 हजाराचे गाजर…’ आता हवा शहराला फक्त घड्याळाचा गजर ! अशा आशयाचे फ्लेक्स संपूर्ण शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये लावण्यात आले. या फ्लेक्सबाजीमुळे सत्ताधा-यांनी तीन हजार रुपये देण्याच्या नावाखाली कष्टकरी जनतेची कशी फसवणूक केली हे उघडकीस आल्यानंतर कष्टक-यांनी सत्ताधा-यांवर टिका टिपण्णी करायला सुरूवात केली. त्यावर बदनामी होऊ लागल्याने संताप चढलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत आयुक्तांना चांगलेच टार्गेट केले. आयुक्तांनी आमची सुपारी घेतली आहे का ? आयुक्त राजकीय पक्ष काढणार आहेत का ? आयुक्तांनी आम्हाला विश्वासात घेऊन चुना लावला. आमची घोर फसवणूक केली. विरोधी पक्षाकडून आमची बदनामी करण्याचा कट आयुक्तांनी रचल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. शेवटी तीन हजार रुपये वाटप करण्याच्या आपयशी ठरलेल्या योजनेचे खापर नगरसेवकांनी आयुक्तांच्या माथी फोडले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी देखील जशासतसे उत्तर देऊन लांडे यांच्या फ्लेक्सबाजीचे समर्थन केले.

सत्ताधा-यांपुढे दिलेला शब्द पाळण्याचे आव्हान

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने लॉकडाऊन काळात भरडलेल्या कष्टक-यांना आर्थिक उभारी देण्यासाठी तीन हजार रुपये देण्याचा शब्द तर दिलाच, परंतु, तो पाळण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. आयुक्त राजेश पाटील नियमात बसत नसल्यामुळे यावर खर्च होणारे सुमारे 40 कोटींहून अधीक रक्कम खर्च करता येणार नसल्याचे सांगत आहेत. त्यावर ही योजना सत्ताधारी कशा पध्दतीने राबवणार आहेत, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button