breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनाने निधन

रायगड – महाड-पोलादपूरचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनाने रात्री उशिरा निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम माणिकराव जगताप यांनी केले. विद्यार्थी काँग्रेसमधून माणिकराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले. परंतु पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम जगताप यांनी केले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button