Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी मंत्री सुरेश नवले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश

बीड : माजी मंत्री सुरेश नवले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. बीड जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोणे एके काळी शिवसेनेत असलेल्या सुरेश नवले यांनी चार दिवसांपूर्वी दिल्लीत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हापासून नवलेंच्या राजकीय पुनरागमनाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

औरंगाबादमधील सिल्लोड शहरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्जुन खोतकर, सुरेश नवले हे शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बीड शहरात सुरेश नवले मित्र मंडळाकडून फटाके वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले होते.

१९९० आणि १९९५ मध्ये बीड विधानसभेसाठी शिवसेनेकडून राज्यातील सर्वात पहिला उमेदवार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश नवले यांचे नाव जाहीर केले होते. सुरेश नवले हे ठाकरे कुटुंबाच्या जवळ मानले जात. नवले हे त्यावेळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेसे ४० आमदार, १२ खासदार, अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मोठे बंड पुकारले. त्यानंतर सुरेश नवले हेसुद्धा सक्रीय झाले आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गेल्यास आपल्या राजकीय पुनरागमनासाठी फायदा होईल, या उद्देशाने नवले शिंदे गटात सहभागी झाल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचाही शिंदे गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. खोतकरांनी आधी दिल्लीत शिंदेंची भेट घेतली होती. यावेळी रावसाहेब दानवेंसोबतही त्यांची दिलजमाई झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर खोतकरांनी जालन्यात जाऊन आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button