पिंपरी / चिंचवड

माजी महापौर कविचंद भाट यांच्या पत्नी शिबनबाई भाट यांचे निधन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कविचंद भाट यांच्या पत्नी शिबनबाई भाट (वय 71) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. शिबनबाई भाट सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. भाटनगर तरुण मंडळाच्या माध्यमातून झोपडपट्टीतील महिलांसाठी त्या काम करत होत्या. भाटनगर येथील इंदिरा गांधी महिला मंडळाच्या संस्थापक सदस्य होत्या. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिबनबाई भाट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button