breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

रूपीनगरमधील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांचा पुढाकार; महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी |

तळवडे- रुपीनगर परिसरातील रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करुन खड्डेमुक्त रस्ते करण्याबाबत माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन नागरिकांना दिलासा द्यावा, असेही भालेकर यांनी म्हटले आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तळवडे येथील दाट लोकवस्ती असलेल्या रुपीनगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. विकासकामांसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत केलेले नाहीत. परिणामी, अनेक ठिकाणी खड्डयांचे साम्राज्य परसरले आहेत.

रुपीनगर परिसरात हजारो कुटुंबाचे वास्तव्य असून, परिसरातील अंतर्गत सोसायट्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन व ड्रेनेजची कामे करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाली. परंतु, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. खड्डयांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरीक आणि वाहनचालकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे, याकड महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. पूर्वी खोदलेले रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत करावेत, अशी आग्रही मागणीही माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button