breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

चिखलीत भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा ‘‘सर्जिकल स्ट्राईक’’

राष्ट्रवादीचे विकास साने यांचा ‘बनाव’ उघड

चिखलीतील पाणी पुरवठ्यावरुन राजकारण

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

आंद्रा प्रकल्पाचे पाणी पिंपरी-चिंचवडकरांना उपलब्ध करण्यासाठी चिखली येथे उभारण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प अल्पावधीतच कार्यान्वयीत होणार आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघासह शहराला पाणी पाणीपुरवठा करणे सुलभ होईल, असा दावा केला जात आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संभाव्य इच्छुक उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी दोन दिवसांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्रावर ‘फेसबूक लाईव्ह’ करीत प्रशासन आणि सत्ताधारी नेत्यांवर टीका केली. चिखलीतील सुमारे २० एकर जागा प्रकल्पाला दिली असताना, या प्रकल्पातून चिखलीत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, असा आरोपही केला. त्यामुळे चिखलीकर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

दरम्यान, विकास साने यांची ‘सोशल मीडिया ट्रायल’ झाल्यानंतर प्रभागातील भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायवाड, सुरेश म्हेत्रे आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे, माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संतोष मोरे, अंकुश मळेकर यांनी जलशुद्धीकरण केंद्रावरुन ‘लाईव्ह’ केले. यावेळी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी रामनाथ टकले, चंद्रकांत मुठाळे, संजय जाधव उपस्थित होते.

चिखलीच्या पाणीपुरवठ्यासाठी कटिबद्ध : कुंदन गायकवाड

कुंदन गायकवाड म्हणाले की, चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून संपूर्ण शहरातील नागरिकांना पाणी मिळणार आहे. चिखलीतील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणार हा दावा निव्वळ दिशाभूल आहे. समाविष्ट गावांतील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पामुळे चिखली, डुडुळगाव, मोशी, चऱ्होली भागातील पाणी पुरवठा सक्षम होण्यास मदत होणार आहे. चिखलीचा पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे आवाहनही कुंदन गायकवाड यांनी केले आहे.

चिखलीसाठी ३० दशलक्ष लीटरचा जलकुंभ : विनायक मोरे

चिखली आणि परिसराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी लवकरच ३० दशलक्ष लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांनी केले आहे.

चिखलीत महत्वाकांक्षी प्रकल्प: दिनेश यादव

समाविष्ट गावांना २० वर्षे पायाभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागली. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून संतपीठ, जलशुद्धीकरण प्रकल्प, बहुउद्देशील सभागृह यासह महत्त्वाकांक्षी प्रकल्प चिखली आणि समाविष्ट गावांमध्ये आणले. त्यामुळे समाविष्ट गावांतील नागरिकांची जीवनमान उंचावले आहे. त्यामुळे नागरिकांनी राजकीय हेतून केलेल्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले.

विकास साने यांचा दावा खोटा…

चिखली येथे आंद्रा धरणातील पाणी आणून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्प लवकरच कार्यान्वयीत होणार आहे. या प्रकल्पातून चिखलीला पाणी मिळणार नाही. अन्य गावांना पाणी मिळेल, असा आक्षेप सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी घेतला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर महापालिका प्रशासनाने संबंधित प्रकल्पातून सर्व समाविष्ट गावांसह शहराला पाणी पुरवठा होईल, असा जाहीरपणे खुलासा केला. त्यामुळे विकास साने यांचा दावा खोटा ठरला आहे. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक असलेले विकास साने यांचा ‘राजकीय बनाव’ही यानिमित्ताने उघड झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button