breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

सलग दुसऱ्या आठवडय़ात संसर्गाचा दर ४ ते ५ टक्क्य़ांवर स्थिर

  • पावसाळी हवेत लक्षणे अंगावर न काढण्याचे आवाहन

पुणे |

जुलै महिन्यात सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात पुणे शहरातील करोना संसर्गाचा दर चार ते पाच टक्के दरम्यान स्थिर राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा असला तरी पावसाळी हवेत ओढवणाऱ्या विषाणूजन्य आजारांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत. करोना रुग्णसंख्येने शहरात नियंत्रण मिळवले असले, तरी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर पावसानेही शहरात हजेरी लावली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारचे विषाणूजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांची आणि करोनाची लक्षणे सारखी असतात. त्यामुळे लक्षणे दिसल्यास चाचणी करण्यात किं वा डॉक्टरांचा सल्ला घेण्यात दिरंगाई न करण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. मार्च २०२० पासून पुणे शहरात हातपाय पसरलेल्या करोना साथीची दुसरी लाट मार्च २०२१ पासून पुणे शहरात वाढल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ानंतर शहरातील रुग्णसंख्येचा आलेख ओसरण्यास सुरुवात झाली, मात्र संसर्गाचा दर २५ टक्के एवढा कायम राहिला. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत तो २० टक्के पर्यंत खाली आला.

  • नियम पाळा, सतर्क राहा

जनरल फिजिशियन डॉ. मुके श बुधवानी म्हणाले, पावसाळ्यात वातावरणातील चढ-उतार, पावसात भिजणे अशा कारणांमुळे सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसतात. ही लक्षणे हवामानामुळे असण्याची शक्यता गृहीत धरून डॉक्टरांकडे जाणे टाळू नये. करोना संसर्गाची लक्षणे आणि हवामानातील बदलामुळे उद्भवणाऱ्या आजारांची बहुसंख्य लक्षणे सारखी असतात. त्यामुळे लक्षणे दिसताच घरच्या घरी विलगीकरण, मुखपट्टीचा वापर, गर्दीशी संपर्क टाळणे तसेच हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button