ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आळंदी यात्रेसाठी पीएमपीएमएलच्या वतीने 188 जादा बसेस, गरजेनुसार देणार रात्र बससेवा

पिंपरी चिंचवड | कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त क्षेत्र आळंदी यात्रेसाठी पीएमपीएमएलच्या वतीने 188 जादा बसेस सुरू केल्या जाणार आहेत. शनिवारपासून (दि.27) ते शुक्रवार (दि. 03 डिसेंबर) या कालावधीत मार्गावरील 91 व जादा 188 सर्व मिळून 279 बसेस आळंदी मार्गावर धावतील. तसेच, चार दिवसांसाठी गरजेनुसार रात्र बससेवा देखील दिली जाणार आहे.रात्र बससेवा ही सोमवार ( दि.29) ते गुरूवार (दि. 02, डिसेंबर) या कालावधीत गरजेनुसार देण्यात येणार आहे. यात्रेसाठी रात्री दहानंतर प्रवास करणा-या प्रवाशांसाठी पाच रूपये जादा तिकीट दर आकारले जातील. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, जेष्ठ नागरिक व इतर पासधारकास यात्रा कालावधीत रात्री दहानंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही.

आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक 264 आळंदी ते बहुळगांव हा मार्ग यात्रेच्या काळात संपूर्णत: बंद राहील. तसेच मार्ग क्र. 257 वाघोली ते आळंदी ह्या मार्गावरील बसेस मरकळ रोड वरील लक्ष्मी मंगल कार्यालय येथून संचलनात राहतील. यात्रेनिमितत्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून ते काटेवस्ती येथून सुरू राहिल.खालील बसस्थानकावरून असेल आळंदी यात्रेसाठी बससेवा –

स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, निगडी, देहूगांव, भोसरी, रहाटणी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button