ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एक दीप पर्यावरणासाठी! त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भोसरी-मोशी प्रधिकरण येथे दीपोत्सव

पिंपरी चिंचवड | ‘एक दीप पर्यावरणासाठी’ या संकल्पनेवर आधारित त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भोसरी-मोशी प्रधिकरण येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. संतनगर मित्र मंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व इतर संस्थांच्या सहभागातून गुरूवारी (दि.18) स्पाईन रोड, प्राधिकरण मोशी येथे पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा करण्यात आला.आपला परिसर प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणयुक्त ठेऊन जनजागृती, प्रबोधन करण्याच्या उद्देशाने विठ्ठल वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी परिसरातील महिलांनी पर्यावरणपूरक रांगोळ्या काढल्या होत्या. विठ्ठल वाळुंज यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून देत, आपला परिसर स्वच्छ, सुंदर, हिरवागार राहण्यासाठी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.

अनिल जगताप, साहेबराव गावडे, अजिंक्य पोटे, गणेश सैंदाणे, राजेंद्र ठाकूर, शशिकांत वाडते, भास्कर दातीर, राजेश किबिले, केदार काका तसेच शोभा फटांगडे, मिना आखाडे, शिला इचके, ज्योती दरंदळे, प्रणिता मोरे यांनी उपक्रमाच्या संयोजनात मोलाची भूमिका बजावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button