breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

‘Flipkart Big Billion Days’ 2020 सेलची सुरुवात 16 ऑक्टोबर पासून

Flipkart Big Billion Days 2020 सेलची सुरुवात १६ ऑक्टोबर पासून होणार आहे. वॉलमार्टची मालकी असलेल्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटने अखेर सेलच्या तारखेवरचा पडदा हटवला आहे. Flipkart Plus ग्राहकांना अर्ली अॅक्सेस अंतर्गत १५ ऑक्टोबर पासून बिग बिलियन डेज सेल मध्ये शॉपिंग करू शकणार आहे.

Flipkart Big Billion Days 2020 सेलची सुरुवात १६ ऑक्टोबर पासून होणार आहे. वॉलमार्टची मालकी असलेल्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटने अखेर सेलच्या तारखेवरचा पडदा हटवला आहे. बिग बिलियन डेज सेल २१ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. यात मोठ्या संख्येत ऑफर्स आणि डिल दिले जाणार आहेत. फ्लिपकार्टने आधीच खुलासा केला आहे की, एसबीआय बँक कार्ड्स धारकांना खरेदीवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. Flipkart Plus ग्राहकांना अर्ली अॅक्सेस अंतर्गत १५ ऑक्टोबर पासून बिग बिलियन डेज सेल मध्ये शॉपिंग करू शकतील.

एसबीआय कार्ड इंस्टंट डिस्काउंट शिवाय फ्लिपकार्ट बजाज फिनजर्व ईएमआय कार्ड आणि मोठ्या बँकांच्या डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जाणार आहे. पेटीएम वॉलेट आणि पेटीएम यूपीआय द्वारे ट्रान्झॅक्शन केल्यास कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. बिग बिलियन डेज २०२० सेल अंतर्गत फ्लिपकार्टवर मोबाइल, टीव्ही, होम अप्लायन्सेज, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीज तसेच अन्य दुसऱ्या कॅटेगरीतील प्रोडक्ट्सवर सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टने शनिवारी स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या टॉप डिल्सचा खुलासा केला आहे.

फ्लिपकार्टने म्हटले आहे की, आपल्या किराना ऑनबोर्ड प्रोग्राम वाढवण्यासाठी कंपनीने ५० हजार किराना स्टोर्सला जोडले आहे. ई रिटेलरचा हेतू हा आहे की, देशातील ८५० हून अधिक शहारात ही डिलिवरी पोहोचायला हवीय. फ्लिपकार्ट प्रमाणे अॅमेझॉन सुद्धा आपले वार्षिक Great Indian Festival सेलची घोषणा केली आहे. परंतु, अॅमेझॉनने याच्या तारखेचा खुलासा अद्याप केला नाही. लवकरच याची माहिती दिली जावू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button