breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल

नवी दिल्ली | प्रतिनिधी 
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. १० मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री ८ नंतर निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल.

कोणत्या राज्यात कधी मतदान?
उत्तर प्रदेश
पहिला टप्पा – १० फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा – १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
तिसरा टप्पा – २० फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
चौथा टप्पा – २३ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
पाचवा टप्पा – २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पा – ३ मार्च २०२२ रोजी मतदान
सातवा टप्पा – सात मार्च २०२२ रोजी मतदान

पंजाब – 14 फेब्रुवारी 2022

उत्तराखंड – 14 फेब्रुवारी 2022

गोवा – 14 फेब्रुवारी 2022

मणिपूर –

पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी २०२२

दुसरा टप्पा – तीन मार्च २०२२

कोरोना काळात निवडणुका घेणं आव्हानात्मक आहे. 690 विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत. 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ८० पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंग असणार असेही सांगण्यात आले. पाच राज्यांच्या निवडणुकीत एकूण 18.34 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 8 कोटी 55 लाख महिला मतदार आहेत. सर्वच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली आहेत, यूपीतली वाढ सर्वाधिक 29 टक्के इतकी आहे. पाच राज्यांच्या या निवडणुकीत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्याचाही पर्याय आहे. हा पर्याय बंधनकारक नसेल तर ऐच्छिक आहे. प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रावर महिलांसाठी महिलांद्वारे संचालित मतदान केंद्र असणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात येईल.

आधीचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार
2017 चे विधानसभा निकाल असे होते
उत्तर प्रदेश – 403
भाजप+ – 325
सपा – 47
बसप – 19
काँग्रेस – 07
इतर – 05

उत्तराखंड – 70
भाजप – 57
काँग्रेस – 11
इतर – 02

गोवा – 40
भाजप – 17
काँग्रेस – 13
म. गोमांतक – 03
गोवा फॉरवर्ड – 03
इतर – 04

मणिपूर – 60
भाजप – 21
काँग्रेस – 28
एनपीपी – 04
एनपीएफ – 04
इतर – 3

पंजाब – 117
भाजप – 3
काँग्रेस – 77
आप – 20
अकाली दल – 15
इतर – 2

या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते असतील…
निवडणुकांमधील गाजलेले मुद्दे
उत्तर प्रदेश
राम मंदिर निर्माण
शेतकरी आंदोलन
हाथरस बलात्कार प्रकरण
लखीमपूर हिंसाचार
गंगेतील कोरोना बळींचे मृतदेह

पंजाब
शेतकरी आंदोलनातील पंजाब
पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद
कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अंमली पदार्थांचं सावट
पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न

गोवा
काँग्रेसमधील गटबाजी
तृणमूल काँग्रेस आणि आपची एन्ट्री
स्थानिक पक्षांच्या आघाड्या
महाविकास आघाडीचा प्रयत्न
रोनाल्ड़ोच्या पुतळ्याचा वाद

उत्तराखंड
भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहरा नाही
सहा महिन्यात तीन मुख्यमंत्री बदलले
शेतकरी आंदोलन
कोरोना आणि प्रशासन
काँग्रेसमध्ये हरिश रावत यांची नाराजी

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button