breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे आढळले नवीन पाच रुग्ण

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले पाच नवीन रुग्ण आज (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. रँन्डम तपासणीत दोन पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे. आज शहरात ओमायक्रॉनचे नवीन 5 रुग्ण आढळले. रँन्डम तपासणीत या पाच जणांचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आजपर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा 1656जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1529 जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले 41 तर त्यांच्या संपर्कातील 28 जण पॉझिटीव्ह आले. तर, 1460 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. परदेशातून आलेल्या 41 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 14 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. संपर्कातील 28 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 11 ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होते. तर, रँन्डम तपासणीत 8 रुण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आले आहेत. 16 जण ओमायक्रॉन संसर्गमुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button