पिंपरी / चिंचवड

ऑडी कारला कट मारण्याच्या बहाण्याने पळवले कारमधील पाच लाख रुपये

पिंपरी l प्रतिनिधी

ऑडी कारला कट मारण्याच्या बहाण्याने जवळ येऊन अज्ञात व्यक्तीने कारमधून पाच लाख रुपये पळवून नेत फसवणूक केली. ही घटना 9 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता च-होली येथे घडली.

रोहित दामोदर रांदड (वय 38, रा. मोशी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चालक अमोलसिंग राणा हा फिर्यादी यांची ऑडी कार चालवतो. तो 9 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता कार चालवत असताना अज्ञात व्यक्ती मोपेड दुचाकीवरून आली. त्या व्यक्तीने कारला कट मारण्याचा बहाणा केला आणि कारमधून पाच लाख रुपये असलेली पिशवी फसवून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button