पिंपरी / चिंचवड

चोरीच्या चार घटनात पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील बेबडओहोळ गावात, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव आणि मारुंजी येथे चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये पाच लाख दोन हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 30) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ऋषिकेश संपत घारे (वय 23, रा. बेबडओहोळ, ता. मावळ) यांनी शिरगाव चौकीत अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 29) रात्री दहा ते बुधवारी (दि. 30) सकाळी साडेसह वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कडी, कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. किचन रूममधील लोखंडी कपाटातून 52 ग्राम सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 42 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

अभिजित आनंदराव साबळे (वय 30, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या घराला कुलूप लाऊन मूळ गावी कोल्हापूर येथे गेले होते. मंगळवारी (दि. 29) रात्री आठ ते बुधवारी (दि. 30) सकाळी आठ वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घरातून सहा ग्राम सोन्याचे, 68 ग्राम चांदीचे दागिने असा एकूण 29 हजारांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

कुरेश ताहेर दलाल (वय 41, रा. पिंपळे गुरव) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 29) रात्री नऊ ते बुधवारी (दि. 30) सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या सेफ डोकोर हार्डवेअर या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 61 हजारांचे साहित्य चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

मनीषा विष्णू भोसले (वय 37, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 29) रात्री बारा ते बुधवारी (दि. 30) पहाटे दोन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाजा वाटे प्रवेश केला. घरातून 14 तोळे पाच ग्राम सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण दोन लाख 70 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button