पिंपरी / चिंचवड

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख 90 हजारांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

केवायसी अपडेट करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अज्ञातांनी एका ज्येष्ठ नागरिकाला पाच लाख 90 हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी दुपारी पूर्णानगर चिंचवड येथे घडली.

मुरलीधर चंद्रशेखर रानडे (वय 63, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी गुरुवारी (दि. 14) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसबीआय बँक खाते क्रमांक 373556445793, 11388920774, 40732490266, 4597880162096, 4597877162092, 34893763235,  7855836258 मोबाईल क्रमांक धारक, तसेच Quick Support या अॅपच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाईल क्रमांक धारकाने फिर्यादी यांना केवायसी अपडेट करण्यास मदत करतो असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी Quick Support हे अॅप डाउनलोड केले. त्यावर आलेला सहा अंकी नंबर फिर्यादी यांनी आरोपीला पाठवला असता त्यांच्या बँक खात्यातून 90 हजार रुपये कमी झाले. त्यांनतर आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि कर्जाची रक्कम वरील बँक खात्यांवर ट्रान्सफर करून फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button