पिंपरी l प्रतिनिधी
निगडी आणि भोसरी परिसरात शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाया करत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.
निगडी येथे गुरुवारी (दि. 14) गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. यात चौघांवर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हृतिक अनिल जाधव (वय 22), मनीष विजय जाधव (वय 19), प्रतीक वाघ (वय 22), श्रेयस पवार (वय 20, सर्व रा. आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.
भोसरी पोलिसांनी देखील गुरुवारी (दि. 14) दुपारी अडीच वाजता सदगुरुनगर, भोसरी येथे कारवाई केली. यात पोलिसांनी असिफ इस्माईल शेख (वय 25, रा. सदगुरुनगर, भोसरी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे.