breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

इस्रायलमध्ये आढळला फ्लोरोनाचा पहिला रुग्ण! चौथ्या बूस्टर डोसला अनुमती

जेरुसलेम | टीम ऑनलाइन
कोरोना आणि ओमायक्रॉनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यातच आता इस्रायलमध्ये फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. फ्लोरोना हा कोविड-१९ आणि इन्फ्लूएंझाचे डबल इंफेक्शन आहे. अरब न्यूजने गुरुवारी ही माहिती दिली. दरम्यान, शुक्रवारी इस्रायलमध्ये कोरोनाविरुद्धच्या चौथ्या बूस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे. इस्रायलली मीडियानुसार, चार महिन्यांपूर्वी येथे कोरोनाच्या लसीचा बूस्टर डोस देण्यात आला होता पण आता ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना येथील सरकारने कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकसंख्येला चौथ्या बूस्टर डोसची परवानगी दिली आहे.

इस्रायलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १,३८०,०५३ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लोकांना साथीच्या आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी १,३४९,०३० लोक या आजारातून बाहेर आले आहेत. याठिकाणी अद्यापही २२ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button