breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बिग बॉस मराठी सिझन ३चा पहिला दिवस! मीरा आणि स्नेहामध्ये होणार भांडण

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन ३ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली. स्पर्धक कोण असतील? घर कसे असेल? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. अखेर काल संध्याकाळी ७ वाजता या सगळ्यावरून पडदा उघडला. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली. सिध्दार्थ जाधवने त्यांना उत्तम साथ देत पुन्हाएकदा सगळ्याची मने जिंकली. स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची एंट्री झाली. याशिवाय तरुण कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांचीदेखील एंट्री झाली. सोनाली पाटील यांची बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक एककरून १४ सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात आले. बिग बॉस मराठीचे अलिशान घर पाहून सगळेच अवाक झाले.

आज बिग बॉस मराठीच्या घरात पाहिल्याच दिवशी मीरा आणि जयमध्ये भांडण, तर मीरा आणि स्नेहामध्ये बाचाबाची होणार आहे. मीराने जयला सुनावले ‘जय मला डोक आहे.’ तर स्नेहाने मिराला ‘ही काय पध्दत आहे का बोलायची?’ असे खडसावले. आता हे वाद कशावरून झाले? पुढे काय झाले? हे आजच्या भागामध्ये कळेलच. त्यासाठी पाहा बिग बॉस मराठी सिझन ३ रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button