Mahaenews

‘जीवन रिक्षा’ उपक्रमाअंतर्गत शंभर रिक्षाचालकांना प्रथमोपचार व सीपीआर प्रशिक्षण

First aid and CPR training to 100 rickshaw pullers under 'Jeevan Riksha' initiative

Share On

पिंपरी चिंचवड | ‘जीवन रिक्षा’ उपक्रमाअंतर्गत शंभर रिक्षाचालकांना प्रथमोपचार व सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रथमोपचार सप्ताहानिमित्त ‘बघतोय रिक्षावाला फोरम’ व हृदय मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.आज (दि. 15) दुपारी साडेबारा वाजता, नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपरी येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.

रस्ते अपघातातील जखमींना योग्य वेळी प्रथोमोपचार मिळाल्यास 50 टक्के जखमींचा दरवर्षी जीव वाचू शकतो. तसेच गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका टळू शकतो, असा निष्कर्ष सडक परिवहन आणि महामार्ग या भारत सरकारच्या मंत्रालयाने काढला आहे. रिक्षाचालकांना प्रथमोपचार करण्यासाठी मार्गदर्शन केले तर ते अनेक अपघात पीडितांचे प्राण वाचवू शकतात.‘बघतोय रिक्षावाला फोरम’ तर्फे ‘जीवन रिक्षा’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावर्षी जवळपास पाच हजार रिक्षाचालकांना प्रथोमोपचार व सीपीआर प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

या वेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या रिक्षाचालकांना रिक्षात ठेवण्यासाठी प्रथोमोपचार पेटी व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन संतोष उबाळे, सोमनाथ म्हस्के, बळीराम घायाळ, आप्पा हिरेमठ, अल्ताफ शेख, नजीर सौदागर, कृष्ण उमाळे, प्रताप रोकडे, भैरव पवार, सचिन शिंदे, संतोष आदमने, अनिल धोत्रे यांनी केले.

Exit mobile version