breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

फटाक्यांच्या धुराने दिल्लीची हवा बिघडली, आतषबाजीमुळे वायू प्रदूषण वाढले

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली आहे.

वाळी काळात दिल्लीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत दिल्लीचा आयक्यूआय ३०१ इतका नोंदवण्यात आला होता. तर, सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या वेळीही मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाल्याने दिल्लीत वायू प्रदूषण वाढले आहे, असा अंदाज एअर स्टॅण्डर्ड एजन्सीने वर्तवला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या आदल्या दिवशी रविवारी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI- Air Quality Index) २५९ नोंदवला गेला, जो सात वर्षांतील सर्वात कमी आहे. रविवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारतीय संघाच्या विजयाबद्दल लोकांनी आनंदात फटाके फोडले. दिल्लीत फटाके बंदी असतानाही जोरात आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे हवेचे आरोग्य अत्यंत गंभीर श्रेणीत पोहोचले आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिल्लीचं तापमान बदलत आहे. प्रदुषणामुळे हवामानावर परिणाम होत आहे. त्यामुळे वायू, ध्वनी प्रदुषणामुळे दिल्लीकरांना स्वच्छ हवा मिळत नाही. त्यामुळे प्रदुषण रोखण्याकरता बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरीही फटाके बंदीचा नियम धुडकावून दिल्लीकरांनी जोरात आतषबाजी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button