Views:
11
नवी दिल्ली | गुरुवारी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आज, निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची बाब अशी की, आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
४ नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले होते, त्यानंतर इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९५.४१ रुपये, तर डिझेलचा दर प्रति लिटर ८६.६७ रुपये एवढा आहे. तसेच मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९८ व ९४.१४ रुपये एवढा आहे. तर कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी १०४.६७ रुपये आणि डिझेलसाठी ८९.७९ रुपये आकारले जात आहेत. त्याचबरोबर चेन्नईत एक लिटर पेट्रोलचा दर १०१.४० रुपये आणि डिझेलचा दर ९१.४३ रुपये एवढा आहे.