breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

…अन् अखेर योगी आदित्यनाथ यांनी नोएडाबद्दलचा ‘तो’ अंधविश्वास ठरवला खोटा; म्हणाले होते “मी असलं की मानत नाही”

नवी दिल्ली |

उत्तर प्रदेशात भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी ठरली असून योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. या विजयासोबत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. तसंच अनेक विक्रम रचले असून याआधी कोणीही करु शकलं नाही अशी कामगिरी केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी नोएडाबद्दल असणारी एक दंतकथा खोटी ठरवली आहे.

उत्तर प्रदेशात ३७ वर्षानंतर एखादं सरकार पुन्हा सत्तेत परतत आहे. यासोबत दुसरीकडे योगी आदित्य़नाथ यांनी नोएडाला अपशकुनी ठरवणारा एक अंधविश्वासही खोटा ठरवला आहे. उत्तर प्रदेशचा कोणताही मुख्यमंत्री नोएडामधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात गेला तर तो पुन्हा सत्तेत येत नाही अशी गेल्या तीन दशकांपासून दंतकथा आहे. पण योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता मिळवत हे खोटं असल्याचं सिद्ध केलं.

  • २० पेश्रा अधिक वेळा केला नोएडाचा दौरा

योगी आदित्यनाथ २०१७ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या नोएडा दौऱ्यावरुन अनेकांनी शंका उपस्थित केली होती. यावेळी त्यांनी आपण हे सर्व मानत नसून हा अंधविश्वास असल्याचं सिद्ध करु असं म्हटलं होतं, आणि तसंच झालं आहे. योगी आदित्यनाथ यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात २० वेळा नोएडाचा दौरा केला. महत्वाचं म्हणजे अखिलेश यादव पाच वर्षाच्या कार्यकाळात एकदाही येथे आले नव्हते. आदित्यनाथ गोरखपूर अर्बन मतदारसंघातूनही विजयी होत आहेत. याशिवाय गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील तिन्ही भाजपा उमेदवारही विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

  • मायावतींनी २०११ मध्ये केला होता दौरा

अखिलेश यांच्या आधी मुलायम सिंह यादव आणि राजनाथ सिंह यांनीदेखील नोएडाचा दौरा केला नव्हता. तर मायावती यांनी २००७ ते २०११ दरम्यान तीन वेळा नोएडाला गेल्या होत्या. २०२१ मध्ये त्या सत्तेतून बाहेर पडल्या. पण योगी यांनी कशाचीही पर्वा न करता दौरा केला आणि टीकाकारांचं तोंडही बंद केलं.

  • अशी झाली सुरुवात…

१९८८ मध्ये वीर बहादूर सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि ते नोएडा दौऱ्यावर गेले. त्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नंतर १९८९ साली एन. डी. तिवारी नोएडामधील सेक्टर १२ मध्ये नेहरु पार्कच्या उद्घाटनाला गेले आणि काही दिवसांत त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. नंतर कल्याण सिंह आणि मुलायम सिंह यांच्यासोबतही असाच प्रकार घडला आणि हा विश्वास अधिक दृढ झाला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button