breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात सलामी

पुणे | प्रतिनिधी 
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ  यांचे मंगळवारी (ता.४) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी सिंधूताई यांना हार्नियाच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आजारावरील उपचारासाठी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार चालूच होते. मात्र मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उपचार चालू असतानाचा त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

सिंधूताई सपकाळ यांना शासकीय इतमामात सलामी

पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार होत आहेत. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली.सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button