ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजन

पन्नास वर्षांपूर्वी भोसरीकरांनी केला बालगंधर्वमध्ये नाटकाचा प्रयोग….

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड मधील भोसरी गाव कुस्ती आणि रांगडेपणा यासाठी प्रसिद्ध आहे. याच भोसरीतील तरुणांनी ‘होनाजी बाळा ‘या नाटकाची निर्मिती केली. बालगंधर्व रंगमंदिरात त्याचा प्रयोग करण्याचे स्वप्न उराशी बाळगले, ते प्रत्यक्षात आणले. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. ही अचंबित करणारी घटना आहे.भोसरीतील कृष्णा नथू फुगे यांच्या पुढाकारातून 1961 मध्ये भोसरी ग्रामसेवा विद्यार्थी मंडळाची स्थापना झाली. गावातील तरुणांनी एकत्र येऊन अनेक उपक्रम केले. अनेक नाटकांची निर्मिती केली. त्यामध्ये होनाजी बाळा, शाहीर अनंत फंदी, शिवा रामोशी, बेबंदशाही, तीन पिढ्यांचा वैरी. अशा अनेक नाटकांचा समावेश होता. 1962 ते 72 या काळात या नाटकांचे परिसरात अनेक प्रयोग केले. पण पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात 1971 मध्ये होनाजी बाळा या नाटकाचा प्रयोग सादर करून स्वप्नपूर्ती केली.

या नाटकामध्ये हनुमंत लांडगे, सयाजी लांडगे, मारुती लांडगे, शिवराम माने, मारुती गव्हाणे, रघुनाथ गव्हाणे, रमेश डोळस ,कृष्णा फुगे आदींनी भूमिका केल्या होत्या. अशा प्रकारची नाटके सत्तरच्या दशकात पिंपरी-चिंचवडमधील अनेक गावात होत होती. हौशी नाटक मंडळींनी बसवलेल्या, नाटकातून मिळणारे उत्पन्न त्यांनी गावातील विकासासाठी खर्च केले. अशाप्रकारे कला आणि विकास यांचा संयोग या परिसरात पाहायला मिळतो. असे मत शहराचे अभ्यासक व गाव ते महानगर या पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांनी मांडले.

होनाजी बाळा या नाटकाचा प्रयोग सादर करणारी मंडळी आज हयात नाहीत किंवा वयोवृद्ध झाले आहेत. अनेक तरुणांनी या नाटकाचा प्रयोग पाहिला होता. त्यापैकी बाळासाहेब गव्हाणे यांनी आठवण सांगितली,” आम्ही कॉलेजला असताना हा प्रयोग झाला. त्यावेळी नाटकाची पंचक्रोशीत चर्चा झाली होती. नाटकातील अनेक प्रसंग आजही आठवतात. भोसरीच्या संस्कृतिक जगतातील ही मोठी घटना आहे. असे अनेक जणांना वाटते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button