breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंब्र्यात कारवाई करणाऱ्या महापालिका सहाय्यक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला; आरोपी अद्याप मोकाट

मुंब्रा |

मुंब्रा येथे अतिक्रमणावर कारवाई केल्याने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांच्यावर जीवेघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद कुरेशी याने सागर साळुंखे यांच्यावर जीवेघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे अतिक्रमणावर कारवाई केल्याने मोहम्मद कुरेशी याने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांच्यावर जीवेघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला साळुंखे यांनी चुकवला आणि सुदैवाने वाचले. सोमवारी सांयकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी मोहम्मद कुरेशीविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक नाही.

  • कल्पिता पिंपळे यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला

ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली होती. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला होता. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली होती.

पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला होता. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले होते. घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले होते. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली होती. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button