किशोर देवराम राणे (वय 46, रा. महाजन गल्ली, यावल, जळगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान 379 अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथे किसान तर्फे कृषीप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रविवारी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी फिर्यादी शेतकरी यांनी प्रदर्शनाला भेट दिली त्यावेळी त्यांच्या खिशातील 80 हजार रुपये किंमतीचा आयफोन (पी 12 प्रो मॅक्स) अज्ञात चोरट्याने पळविला आहे. अशाच प्रकारे इतर अनेकांचे देखील मोबाईल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.