breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रसिद्ध युट्यूबर मोस्टली सेन कोरोनाबाधित, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

मुंबई – प्रसिद्ध युट्यूबर मोस्टली सेन  म्हणजे मराठमोळी प्राजक्ता कोळी  हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

प्राजक्ता कोळी युट्यूबवर कॉमेडी कॉन्टेट क्रिएटर आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस ती न चुकता व्हिडिओ प्रसिद्ध करत असते. गेल्या पाच वर्षांपासून तीने यात सातत्य ठेवलं आहे. एकही आठवडा न चुकवता तिने सलग पाच वर्ष दर आठवड्याला व्हिडिओ प्रदर्शित केले आहेत. मात्र, या आठवड्यात ती व्हिडिओ टाकू शकणार नसल्याचं तिने ट्विटमध्ये म्हटलंय. तेव्हाच तिने कोरोनाची लागण झाल्याचंही सांगितलं.

https://www.instagram.com/p/CNxoRYLjDGV/?utm_source=ig_embed&ig_mid=3F342BC8-C0B5-4634-9E9E-333972BDC2C1

“सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी व्यवस्थित आहे. माझे डॉक्टर आणि माझा परिवार माझी योग्य प्रकारे काळजी घेत आहेत. तुमच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल आभार. सुरक्षित रहा, मास्क वापरा.”, असं प्राजक्ताने म्हटलं आहे.

प्राजक्ताच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि मित्रपरिवाराने कमेंट्स करत तिची विचारपूस केली आहे.अभिनेते गजराज राव, अभिनेत्री श्वेता त्रिपाठी, गायक टोनी कक्कर, अरमान मलिक, मल्लिका दुआ, युट्युबर आशिष चंचलानी यांनीही तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला काळजी घेण्यास सांगितले आहे.

प्राजक्ता ‘मोस्टली सेन’ या नावाने प्रसिद्ध आहे. तिने ‘खयाली पुलाव’ या लघुपटात तर नेटफ्लिक्सवरच्या ‘मिसमॅच्ड’ अशा सिरीजमध्ये कामही केलं आहे. त्याचबरोबर तिने मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी #GirlsCount या चळवळीत सहभागही घेतला होता. संयुक्त राष्ट्रांच्या गोलकिपर्स प्रोग्रॅममध्ये ती सहभागी झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button