breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली – बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाने तरूणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोलकातामधील रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 11 च्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे.

अरिजीत सिंह यांच्या आईवर कोलकातामधील रूग्णालयात उपचार चालू होते. उपचारादरम्यान त्यांना A निगेटिव्ह रक्त गटाची आवश्यकता होती. याबाबत अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी पोस्ट करत माहिती दिली होती आणि त्या रक्त गटाच्या रक्ताची अरिजीतच्या आईला गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कोलकातामधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं.

डाक्टरांनीही अथक प्रयत्न केले मात्र गुरूवारी सकाळी अरिजीतच्या आईची प्रकृती खालावत गेली आणि अरिजीत सिंहच्या आईची प्राणज्योत मालवली. पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं दिसत आहे. कारण गेल्या 24 तासात 157 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचं आकडेवारीवरून कळतंय.

दरम्यान, अरिजीत सिंग 2005 पासून चित्रपटसृष्टीसाठी गात आहे. त्याच्या गाण्यांचा खास करून तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात फॅन आहे. ‘कबीरा’, ‘राब्ता’, ‘खैरियत’, ‘अगर तुम साथ हो’, अशी अनेक हिट गाणी त्याने गायली आहेत. वयाच्या 18 वर्षी त्याने आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button