Uncategorizedमुंबई

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ‘स्वातंत्र्यदिनी’ ठार मारण्याची धमकी…!


मुंबई  । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला अज्ञात व्यक्तीने फोनवरून ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता.१५) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर सोमवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. अज्ञात व्यक्तीने फोनवरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धमकी आलेल्या क्रमांकाची तपासणी केली. तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आहे. तरी, पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानी आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. पोलिसांचे एक पथक अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी रवाना झाले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘अँटिलिया’ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button