breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बॉलिवूडचे प्रसिद्ध विनोदी अभिनेते मुश्ताक मर्चंट यांचे निधन

मुंबई | प्रतिनिधी 

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते मुस्ताक मर्चंट यांचे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते मधुमेहाने आजारी होते. त्यांच्यावर होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांनी दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटात मुस्ताक मर्चंट यांनी दोन भूमिका केल्या होत्या. त्यातील एक म्हणजे ते ट्रेनचे ड्रायव्हर होते. तर दुसरी जय-वीरू यांनी ज्यांची मोटरसायकल चोरली त्या मोटरसायकलचे ते मालक होते. अशा दोन भूमिका त्यांनी या चित्रपटात केल्या होत्या. तसेच ‘सीता और गीता’, ‘जवानी दीवानी’, ‘हाथ की सफाई’, ‘सागर’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यानंतर १६ वर्षांपूर्वी त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button