breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

व्हायरल झालेलं दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक बनावट – CBSE

नवी दिल्ली – सोशल मीडियात सध्या व्हायरल झालेल्या सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक (डेटशीट) फेक (बनवाट) असून ते बोर्डानं जाहीर केलेलं नाही, असं स्पष्टीकरणं स्वतः सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आलं आहे.

दहावी, बारावीच्या पहिल्या टर्मच्या परीक्षेचे वेळापत्रक सीबीएईकडे तयार आहे. मात्र, बोर्डाकडून अधिकृत न केलेलं वेळापत्रक सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल झालं आहे. यावर बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. बोर्डानं ट्विटद्वारे म्हटलं की, “आम्हाला हे दिसून आलं आहे की, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या पहिल्या टर्मचं वेळापत्रक सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं आहे. त्यामुळे हे स्पष्ट करण्यात येत आहे की, या परीक्षांसंदर्भात आत्तापर्यंत बोर्डानं कुठल्याही प्रकारचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.”

दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी म्हणजे आजच CBSEच्या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक जाहीर होणार आहे, अद्याप ते जाहीर झालेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button