ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नानांच्या प्रचाराला फडणवीस येऊन गेले; मुख्यमंत्र्यांकडून खास शैलीत समाचार

कोल्हापूर | शहर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं असून आज महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना आक्रमक प्रत्युत्तर देत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

‘विश्वजित नानांच्या प्रचारासाठी फडणवीस आले होते. आता हे दोन शब्द एकत्र जुळले तर त्याचा परिणाम-दुष्परिणाम काय होतो, हे मी सांगण्याची गरज नाही. विरोधकांवर खोटेनाटे आरोप करून आपलं घोडं पुढे सरकतंय का हे बघायचं, अशी भाजपची सवय झाली आहे. आम्ही कामात कमी पडत नाही, आपत्ती आली तर मदतीला धावून जाण्यात कमी पडत नाही, आम्ही फक्त खोटं बोलण्यात कमी पडतो. मात्र कमी पडलो तरी चालेल, पण खोटं बोलणार नाही,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे.

भाजप नेते जर कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरले तर ते आधी पैलवानांच्या घरी धाडी टाकतील, कारण समोरून वार करण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईवरून भाजपला चिमटा काढला.

मुख्यमंत्र्यांच्या संभाषणातील ठळक मुद्दे :

– कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहील
– श्रीराम यांचा जन्म झाला नसता तर भाजपने कोणत्या मुद्द्यावर राजकारण केलं असतं? कारण त्यांच्याकडे दुसरे काहीच मुद्दे नाहीत
– महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आपत्तींचं सत्र
– भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, आम्ही तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button