breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

नग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय

मुंबई |

दुबईमध्ये एका उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये काही महिला नग्नावस्थेमध्ये उभ्या असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर दुबईच्या प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे. व्हिडिओत सहभागी असलेल्या सर्वांची दुबईतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. शनिवारी एका उंच इमारतीच्या बाल्कनीतील महिलांचे नग्नावस्थेतील फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जवळपास ११ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याबाबत दुबईचे अटर्नी जनरल एसाम इस्सा-अल-हुमाईदान यांनी, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या घटनेचा तपास पूर्ण झाला असून फोटोशूटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल अशी माहिती दिली आहे.

शनिवारी उशीरा दुबईमध्ये एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दुबईतील मरिना येथील एका उंच इमारतीत एक डझनहून अधिक महिला बाल्कनीमध्ये नग्नावस्थेमध्ये उभ्या होत्या. युनायटेड अरब अमिरातीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळण्यासंदर्भातील नियमांमध्ये नग्नता आणि कायदेबाह्य वर्तन या गुन्ह्यांच्या समावेश आहे. या प्रकरणी कोणी दोषी अढळल्यास सहा महिने तुरुंगवास आणि पाच हजार दिऱ्हाम्स म्हणजेच जवळजवळ एक लाख रुपये दंड शिक्षेची तरतुद आहे. याप्रमाणे पॉर्नोग्राफिक गोष्टी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून शेअर करणंही युएईमध्ये गुन्हा आहे. देशामध्ये इस्लामिक कायद्यांनुसार शिरिया कायदे लागू करण्यात आले आहेत. अश्लील साहित्याची देवाणघेवाण करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. या प्रकरणी या महिलांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण अखेर त्यांची देशातून हकालपट्टी करण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. इतर मध्य आशियाई देशांपेक्षा दुबई अनेक अर्थांनी नवे विचार स्वीकारणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र येथील कायदे कठोर आहेत. सोशल नेटवर्किंगवर केलेल्या कमेंट आणि व्हिडीओंसाठी अनेकांना अटक करण्यात आल्याची प्रकरणही देशात घडली आहे. येथील कायद्यांमुळेच देशातील अनेक बड्या टेलिकॉम कंपन्यांनी पॉर्नोग्राफीक वेबसाईट बंद केल्यात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button