ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाॅलीटेक्निक काॅलेज येथे मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबीरात 300 जणांची तपासणी

तळेगाव  | आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनातून नगरसेविका संगीता राजेंद्र शेळके व लोकमान्य हॉस्पिटल यांच्या सहकार्याने तळेगाव येथील पाॅलीटेक्निक काॅलेज तळेगाव-चाकण रोड येथे मोफत मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरात तळेगाव, वडगाव, माळवाडी, नवलाख उंब्रे, वराळे परिसरातील 300 नागरिकांची तपासणी करण्यात आली.आरोग्य शिबिरात सांधे दुखी, मणके, मेंदू विकार, ह्रदय विकार, कान, नाक, घसा विकार, स्त्रीरोग, कोरोना नंतरचे आजार आदी आजारावर तपासणी करण्यात आली. हे शिबिर मोफत होते. याचा नागरिकांना फायदा झाला असल्यासाचे तपासणी झालेल्या नागरिकांनी सांगितले.आमदार सुनील शेळके, नगरसेवक किशोर भेगडे, ज्येष्ठ नेत्या रुपाली दाभाडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, सारीका शेळके, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, नगरसेविका मंगल भेगडे ज्योती शिंदे, निशा पवार, वीणा करंडे, सविता मंचरे, विद्या भोसले, संगीता वाघमारे आदी मान्यंवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी हनुमंत म्हाळस्कर, गोकुळ किर्वे, संतोष शेळके, दिलीप शेळके, राजू शेळके,चंद्रसेन बजगुड, शंकर मेटकरी,अनिल म्हस्के, निनाद जोशी, सागर शेळके, रोहन काटे, अपूर्वा शेळके, शुभम कार्ले, ओम कार्ले, गणेश नीळकंठ आदींनी विशेष परिश्रम घेतले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button