breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“वाझे, शर्मांना अटक झाली असली तरी या दोघांमागे असणाऱ्या मास्टर माईंडला वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न”

मुंबई |

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली. स्फोटके पेरणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या, या दोन्ही प्रकरणांत शर्मा यांच्या सहभागाचे पुरावे आढळल्याचा दावा ‘एनआयए’ने न्यायालयात केला आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खऱ्या सुत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. प्रदीप शर्मा यांना अटक झाली असली तरी त्यांच्यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके सापडली. तेव्हा त्याचा मास्टर माईंड कोण हे शोधण्याची मागणी मी केली होती, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच आपण मागणी केल्यानंतर केंद्र शासनाने तपास आपल्या हाती घेतल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. “तीन महिन्यापूर्वी सचिन वाझे यांना अटक झाली तर काल एनआयएने शर्मा यांच्यावर कारवाई केली. मात्र या दोघांच्या मागे दुसरीच ताकत आहे. भाजपा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून अनिल देशमुख यांना मात्र गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता,” असं मुश्रीफ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button