breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मुलीच्या लग्नासाठीच्या मेहंदीवाल्याकडे जाऊनही ईडीनं चौकशी केली”, संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले, “२०२४ नंतर…”

मुंबई |

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच चर्चा सुरू असलेली शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद अखेर आज झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांनी भाजपावर आणि ईडीवर आरोप केले आहेत. तसेच, ईडीनं त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या कारवाईविषयी संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ईडीनं मुलीच्या लग्नाच्या चौकशीत मेहंदीवाल्याला देखील सोडलं नाही, टेलरकडेही जाऊन चौकशी केली, असं राऊत यावेळी म्हणाले.

“आनंद अडसूळ वारंवार सांगतायत की मी निर्दोष आहे. पण तरी त्यांची बदनामी करत राहायचं. भावना गवळी, रवींद्र वायकर, अनिल परब आणि सगळं झाल्यानंतर माझ्यावर आले”, असं संजय राऊत म्हणाले. “भाजपाचे नेते तीन वेळा मला भेटले. त्यांनी सांगितलं की तुम्ही सरकारमधून बाहेर पडा. कोणत्याही प्रकारे हे सरकार घालवण्याची आमची तयारी झाली आहे. एक तर राष्ट्रपती राजवट आम्ही लागू करू किंवा आमदार तोडून आमचं सरकार आणू”, असं सांगताना संजय राऊतांनी भाजपावर आरोप केला.

  • “माझ्या ५५ गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय”

“मी म्हटलं सरकार पडू देणार नाही, तेव्हा माझ्या मागे लागले. त्यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत. माझ्या बँकेत ईडीची लोकं गेल्याचं मला समजलं. माझे २० वर्षांचे बँकेचे स्टेटमेंट घेऊन गेले. माझं गाव अलिबाग. माझी जमीन अलिबागलाच असेल. ते मॉरिशसला नसेल. भाजपाच्या नेत्यांप्रमाणे लंडन-अमेरिकेत माझ्या मालमत्ता नसतील. ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. त्यासाठी किहीम गावातल्या नातेवाईकांच्या घरी पहाटे ४ वाजता जाऊन त्यांना उचलायचं आणि ईडीच्या कार्यालयात नेऊन ठेवायचं. तू संजय राऊतांच्या विरोधात साक्ष दे की त्यांनी तुला किती पैसे दिले. धमक्या द्यायचं काम ईडी करत आहे. कोणत्या कायद्यानं?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

  • “२०२४नंतर बघू काय होतंय ते”

“५५ गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय? किती मोठं काम आहे ईडीकडे? सगळ्यांच नोटिंग झालं आहे ते कोण आहेत ते.. बघू २०२४नंतर काय होतंय ते”, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

  • “मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण माझ्यासोबत…”

आमच्या मुलीच्या लग्नाची चौकशी सुरू आहे. अगदी मेहंदीवाल्यांकडे गेले, नेलपॉलिश करणाऱ्यांकडे गेले आणि विचारलं कितना पैसा दिया? आम्ही म्हणतो, घरात लग्न आहे, घरात यायचं नाही. पण आमच्या घरात अशा पद्धतीने तुम्ही शिरता. मुलांच्या घरात, दुकानात, कामाच्या ठिकाणी शिरून दादागिरी करतायत. देख लेंगे म्हणतायत. मी सांगतो, बघूनच घ्या. जेलमध्ये टाकणार आहात? टाका. मी जायला तयार आहे. पण माझ्यासोबत तुम्हीही असाल. सगळे”, असं राऊत म्हणाले.

  • ..आता टक्कर शिवसेनेशी आहे!

“मी जिथून कपडे शिवले होते, तिथेही गेले होते. काय काय शिवलं, किती रुपयांचं शिवलं वगैरे. कुठे जायचं तिथे जा. पण आता टक्कर शिवसेनेशी आहे”, असंही राऊत म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button