breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ओमिक्रॉनचा उद्रेक; देशात १३,१५४ कोरोनाचे नवे रुग्ण

दिल्ली | टीम ऑनलाइन
कोरोनाचा नवा व्हेरिअंट हा वेगाने पसरत असून कमी होणारी रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. भारतातील रुग्णसंख्येतही वाढ होत असून गेल्या २४ तासात देशात १३ हजार १५४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ओमिक्रॉनच्या  रुग्णांची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक दिल्लीत २६३ तर महाराष्ट्रात २५२ रुग्ण सापडले आहे.

देशातील सक्रीय रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या तुलनेत कमी असली तरी ती आता वाढत चालली आहे. सध्या देशात ८२ हजार ४०२ सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ४२ लाख ५८ रहजार ७७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ८० हजार ८६० जणांनी प्राण गमावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button