breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड गणेशभक्तांसाठी खुला

  • अमर मित्र मंडळ, उदय गायकवाड युवा मंचचा उपक्रम
  • पिंपरी- चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी सायकलपटुंचा सन्मान

पिंपरी | प्रतिनिधी
नदी व घाटावर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी ‘अमर मित्र मंडळ’ आणि ‘उदय गायकवाड युवा मंच’च्या वतीने दिघी येथे गणेश विसर्जन कुंड नागरिकांसाठी खुला करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या सायकलपटुंचाही सन्मान करण्यात आला.

दिघीतील राघव मंगल कार्यालय परिसरात हा विसर्जनकुंड उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१७) कुंडाचे पूजन करण्यात आले. यावेळी हभप दत्तात्रय आबा गायकवाड, पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, उपमहापौर हिरा नानी घुले, नगरसेविका निर्मला मनोज गायकवाड आदी उपस्थित होते.

अमर मित्र मंडळ आणि उदय गायकवाड युवा मंचाच्या वतीने नेहमीच सामाजिक आणि लोकाभिमूख उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोरोना काळातही मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी भरीव उपक्रम राबविण्यात आले. गणेशोत्सवात अनावश्यक खर्च टाळून मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला. दरम्यान, गणेश विसर्जनादरम्यान घाट आणि नदीपात्र परिसरात होणारे प्रदूषण शहराला नवे नाही.

या पार्श्वभूमीवर अमर मित्र मंडळ आणि उदय गायकवाड युवा मंचच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार दिघी परिसरात गणेश विसर्जन कुंड उभारण्यात आला आहे. या कुंडामध्ये पर्यावरण पूरक आणि तितक्याच धार्मिक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात येणार आहेत. यासाठी मंडळाचे स्वयंसेवक उपथित असणार आहेत. तसेच निर्माल्य दानाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याचवेळी पर्यावरण संवर्धन सायकल पटू गौरव सन्मान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायकलिंगद्वारे पर्यावरण वाचवाचा संदेश देणाऱ्या सायकलपटुंना गौरवण्यात आले. विसर्जनादरम्यान नागरिक आणि भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे,एकमेकांमध्ये योग्य अंतर ठेवावे आणि पर्यावरणपूरक कुंडातच गणेश विसर्जन करावे असे आवाहन उदय गायकवाड यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button