breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवजीवन शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दत्तगड डोंगर पायथ्याजवळ उद्या वृक्षारोपण करणार

भाजपा युवा मोर्चा मंडलाध्यक्ष उदय गायकवाड यांची माहिती

 

पिंपरी । प्रतिनिधी

दिघीगांव येथील नवजीवन शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षारंभानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. दत्तगड डोंगर पायथ्याजवळ उद्या (दि.१९ जून २०२१)  वृक्षारोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा भोसरी- चऱ्होली मंडलाध्यक्ष उदय गायकवाड यांनी दिली.

दिघीगांव येथील शिक्षण क्षेत्रातील नामांकीत असलेली नवजीवन शिक्षण संस्था आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

दत्तगड डोंगर पायथ्याजवळ शनिवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात येईल. यावेळी संस्थेचे संस्थापक दत्तात्रय गायकवाड, अध्यक्ष विनायक वाळके, सचिव रविंद्र गायकवाड व त्याचबरोबर अविरत श्रमदानचे सभासद सचिन लांडगे, जितेंद्र माळी, सुनिल कदम, शिवाजी जगताप, दिगंबर जोशी, सिद्धू औसर, सीमा शिंदे, दुधाळे डॉ. लोंढे आदी उपस्थित राहणार आहेत.

तसेच, नवजीवन शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, रामचंद्र गायकवाड प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमर मित्र मंडळ आणि अविरत श्रमदान वृक्ष संवर्धन समितीच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button