Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

३९ व्या वर्षी समंथा रुथ प्रभू होणार आई? व्हायरल व्हिडिओने वेधले सर्वांचे लक्ष

Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा तुफान चर्चेत आली आहे. दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर आता समंथाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही लवकरच आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असून तिचे काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

समंथाचा ‘मा इंती बंगारम’ (Maa Inti Bangaaram) हा नवा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या यशामुळे नुकतीच सिनेसृष्टीतील टीमसाठी एक सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत संपूर्ण टीमने केक कापून आनंद साजरा केला, मात्र या सगळ्यात समंथानेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या पार्टीत समंथाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. मीडियासमोर केक कापताना समंथाचा ‘बेबी बंप’ स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे. ‘इंडिया टुडे’च्या एका रिपोर्टनुसार, ३९ वर्षीय समंथा या वर्षाच्या अखेरपर्यंत पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचे म्हटले आहे. या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. मात्र, अद्याप समंथा किंवा तिचा पती राज निदिमोरू या दोघांनीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा

भारताचा इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर! विराट आणि बुमराहचे पुनरागमन

डिसेंबर २०२५ मध्ये राज निदिमोरूसोबत केली होती लग्नगाठ

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही २०२१ मध्ये अभिनेता नागा चैतन्यपासून विभक्त झाली होती. त्यानंतर ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसिरीजच्या दरम्यान तिची ओळख प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी झाली. पुढे ‘सिटाडेल : हनी बनी’ या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करताना त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या.

या सर्व चर्चांना पूर्णविराम देत डिसेंबर २०२५ मध्ये समंथा आणि राज यांनी ईशा सेंटर येथे अतिशय पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच समंथाच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरू झाल्याने तिचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button