Breaking-newsमनोरंजनमहाराष्ट्रव्यक्तीविशेष : आर्टिकल

ग्रामीण भागातील तरुण ते शॉर्ट फिल्म मेकर

सातारा जिल्ह्यातील कुडाळ गावच्या गणेश धोत्रेची अनोखी 'स्टोरी'

वेग, वेळ आणि अचूकता यांचे अनोखे मिश्रण हे शॉर्ट फिल्म मध्ये असते. शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट आपल्याला अत्यंत जवळचे वाटतात. कारण त्यातील कथा ही आपल्या अवतीभवती घुटमळत असते. त्यामध्ये रोजच्या जगण्यातले जीवन सामावलेले असते. ग्रामीण भागात अशा गोष्टी पदोपदी जाणवतात. याच स्टोरीज हेरून त्यांना साचेबद्ध करून जगासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ गावच्या गणेश धोत्रे या तरुणाने केला आहे. गणेशच्या या प्रयत्नांना यशस्वी रूप देखील मिळाले आहे आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने ही त्याला गौरविण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो असे सांगून गणेश म्हणतो माझे शिक्षण बारावी सायन्स नंतर इंग्लिश विषयात बी ए झालं आहे . गणेशला कलाक्षेत्राची आवड होती.

त्याला डान्स मध्ये करिअर करायचे होते. डान्सच्या या करिअरसाठी सातारा जिल्हा सोडून पुण्यामध्ये येण्याचे धाडस गणेशने केले. पुण्यातील ऐश्वर्या काळे आणि धनेश गुजर त्यांच्या डान्स अकॅडमी मध्ये प्रवेश केला तिथे नृत्य प्रशिक्षण घेतले. गर्जा महाराष्ट्र लोकधारा या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभर दौरे केले.

हेही वाचा  :  ‘नवकल्पनांना व्यवहारिक जोड द्या’; अस्मिता एम.

नृत्याचे प्रशिक्षण घेत असताना. शॉर्ट फिल्म बनवण्याची आवड मात्र मनात कायम होती. याचमुळे 2017 मध्ये नागराज मंजुळे आयोजित विवेक नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मुंबई इथं आयोजित झालेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये निलेश महिगावकर यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित “पुतळा”शॉर्ट फिल्म विवेक नॅशनल फेस्टिवलला पाठवली. हा एक छोटासा प्रयत्न होता.मात्र या प्रयत्नांना खूप मोठे यश मिळाले होते.या शॉर्टफिल्म ला विवेक नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल 2017 ला ( स्पेशल ज्युरी ) अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे.

ही शॉर्ट फिल्म बऱ्याच फेस्टिवल ला सिलेक्ट झाली.

यानंतर नवीन प्रयोग सुरु झाले.”बुरगुंडा “या डॉक्युमेंटरी फिल्म ला एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2020 ला बेस्ट स्टोरी चा अवॉर्ड मिळाला. कल्चरल फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये अहमदाबाद या डॉक्युमेंट्रीला ला बेस्ट कल्चरल फिल्मचा अवॉर्ड देखील मिळालेला आहे. हि त्यांनी केलेल्या नवीन कामाची पोच पावती त्यांना मिळाली.

“2 चाकं 435 दिवस ” या डॉक्युमेंटरी फिल्म ला देखील बऱ्याच पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

5 वा अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव 2022. (सर्वोत्कृष्ट माहितीपट) चौथी एसएनएसएफएफ सांगली 2022. (सर्वोत्कृष्ट माहितीपट), तिसरा आरआयएफ महोत्सव संभाजीनगर 2022. (सर्वोत्कृष्ट माहितीपट ), १६ वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव 2022.(सर्वोत्कृष्ट माहितीपट)

एसएनएसएफडी महोत्सव श्रीरामपूर 2022. (सर्वोत्कृष्ट माहितीपट ), एनटीएसएफ फेस्टिव्हल पुणे 2022. (विशेष ज्युरी) गदिमा चित्रपट महोत्सव 2022. (विशेष ज्युरी)

11 वा आरोग्य चित्रपट महोत्सव 2022. (सर्वोत्कृष्ट माहितीपट ),अरुणोदय चित्रपट महोत्सव 2022. (सर्वोत्कृष्ट माहितीपट), आशियाई टॅलेंट फिल्म फेस्टिव्हल 2022. (सर्वोत्कृष्ट माहितीपट) अशा विविध पुरस्कारांनी या माहितीपटाची दखल घेतलेली आहे.विविध फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये या फिल्म च स्क्रीनिंग झालं आहे. एफ टी आय आय मध्ये सुद्धा या माहितीपटाचे स्क्रीनिंग झालेले आहे.

घरची पार्श्वभूमी फार हलाखीची होती. वडील लोक कलावंत. लोककलेला त्यांनी वाहून घेतलेले कीर्तन भारुड या माध्यमातून त्यांनी कायम लोककलेला पुजले. त्यामुळे घरची परिस्थिती कायम बेताचीच राहिली असे म्हटले तर ते वावनी ठरणार नाही. वडिलांमुळे कला हा प्रांत आपसूकच डोक्यात विणलेला होता वेगळ्या वाटेने तो मी देखील कायम जोपासला. घरची परिस्थिती बेताची होती मात्र कला पूजनीय होती. अशा कमकुवत परिस्थितीतूनच मार्ग काढत काढत आत्ता काही सिनेमांना सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये रांजण, मिथुन, व्हायरल, बलोच आणि झी स्टुडिओच्या रुबाब नावाच्या सिनेमाचा समावेश आहे. सतत नवीन प्रयोग आणि विषयावर फिल्म करता याव्यात यासाठी ड्रीम विनर प्रॉडक्शन ची संस्था आणि यु ट्यूब चॅनेल पण काढले आहे.

यासागळ्या प्रवासात विजय चिकने ,अमोल लोखंडे,शंकर मदने, रोहित घोडके, विकास बोराटे याची साथ सतत मिळाली. निलेश महिगांवकर, प्रकाश पवार,शेखर बापु रणखांबे यांचं योग्य मार्गदर्शन मिळाले.विक्रम शिरतोडे, विशाल शिरतोडे, ऋषिकेश पवार या सगळ्यां क्रिएटिव्ह टीम सोबत पुढचा प्रवास सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button