संगीतकार-दिग्दर्शक पलाश मुच्छल वैयक्तिक आयुष्यामुळे जास्तच चर्चेत
स्मृतीसोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
मुंबई : संगीतकार-दिग्दर्शक पलाश मुच्छल हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आता जास्तच चर्चेत आहेत. स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पुढे त्यांच्या लग्नाच्या अपडेटबद्दल पक्की अशी काहीच माहिती समोर आली नाही. किंवा दोघांपैकी एकानेही पुढे येऊन त्यांच्या लग्नाबाबत काहीच भाष्य केलं नाही एवढंच नाही तर पलाशच्या कथित अफेअर्सबद्दल ज्या बातम्या पसरत आहेत त्या बद्दलही दोघांपैकी कोणीही भाष्य केलं नाही. त्यामुळे स्मृती आणि पलाशचे लग्न होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण आता या वादात,पहिल्यांदाच पलाश मुच्छल दिसला आहे.
स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश पहिल्यांदाच दिसला
स्मृती मानधना आणि पलाशचे लग्न पुढे ढकलल्यापासून, गायक-संगीतकारावर अनेक आरोप होत आहेत. त्यांच्यासोबत एक फ्लर्टी चॅट देखील लीक झाला होता, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. मात्र सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये पलाश विमानतळावर दिसला. व्हिडीओमध्ये तो अगदीच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. हातात फोन आणि पासपोर्ट वैगरे दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत त्याचे घरचेही दिसले. तथापि, तो कोणाशीही न बोलता, कोणालाही काहीही प्रतिक्रिया न देता निघून गेला.
हेही वाचा – चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने अनुराधा साळुंके यांचा प्रचाराचा शुभारंभ !
चेहरा उतरलेला अन् नाराजी स्पष्टच
व्हिडीओमध्ये पलाशची तब्येतही खराब झाल्यासारखी दिसत असल्याच्या कमेंट्स या व्हिडीओवर येत आहे. लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतरच्या वादात पलाश मुच्छल आजारी पडला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आल्याचे वृत्त आहे. नंतर, डॉक्टरांनी स्पष्ट केले की त्याची ही अवस्था तणावामुळे झाली होती. या व्हिडीओमध्ये त्याचा चेहरा उतरलेला अन् नाराजी चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.अनेकांंनी त्याच्या या अवस्थेबद्दलही कमेंट्स केल्या आहेत.
सोशल मीडियावर पलाशची खिल्ला का उडवली जातेय?
पण यातील अजून एका गोष्टीमुळे चाहते पलाशची खिल्ली उडवत आहेत. ते म्हणजे या व्हिडीओवर लावण्यात आलेलं गाणं. ज्याने कोणी हा व्हडीओ व्हायरल केला आहे त्या व्हिडीओवर “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का” हे गाणे लावण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची नेटकरी खिल्ली उडवताना दिसत आहेत. व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तथापि, क्लिपसोबत पॅपने वापरलेले गाण्यामुळे तर अजूनच याची चर्चा होत आहे. एकंदरीतच पलाशच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि खिल्ली उडवणे सुरु आहे.




