ताज्या घडामोडीमनोरंजन

प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया अडचणीत

ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक

मुंबई : प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया अडचणीत सापडली आहे. ‘मुझिब: द मेकिंग ऑफ ए नेशन’ या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या चित्रपटामध्ये तिने बांगलादेशी माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारून खूप प्रशंसा मिळवली होती. तिला ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, ही अटक जुलै 2024 मध्ये शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनांदरम्यान खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणाशी संबंधित आहे.

नुसरत फारिया ही केवळ 31 वर्षांची आहे. प्रथम आलोक या वृत्तपत्रानुसार, अभिनेत्रीला थायलंडला जाताना इमिग्रेशन चेकपॉइंटवर अडवण्यात आले. तिच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एक खटला दाखल आहे. अभिनेत्रीविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. बांगलादेशातील आंदोलनांमुळे शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आणि नंतर त्या भारतात आल्या.

हेही वाचा –  पुण्यात फर्ग्युसन रस्त्यासह अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करून पदपथ मोकळे

शेख हसीना यांची साकारली होती भूमिका

बड्डा झोनचे सहायक पोलिस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी प्रथम आलोकला अभिनेत्रीच्या अटकेची पुष्टी केली. नुसरत फारियाला 2023 मधील ‘मुझिब: द मेकिंग ऑफ ए नेशन’ या चित्रपटात शेख हसीना यांच्या भूमिकेसाठी खूप ओळख मिळाली होती. हा चित्रपट बांगलादेश आणि भारताच्या संयुक्त प्रयत्नाने बनवला गेला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केले होते.

बंगाली चित्रपटांमध्ये केले भरपूर काम

नुसरत फारिया अभिनयात करिअर करण्यापूर्वी रेडिओ जॉकी आणि प्रेझेंटर म्हणून काम करत होती. तिने 2015 मध्ये बांगलादेश-भारत सहयोगाने बनलेल्या ‘आशिकी: ट्रू लव’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक बांगलादेशी आणि भारतीय चित्रपटांमध्ये अभिनय केला. ती प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये दिसली. ती टेलिव्हिजन होस्टिंग आणि मॉडेलिंगमध्येही सक्रिय आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button