Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘धुरंधर 2’ची धडाकेबाज सुरुवात; दोन दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला

Dhurandhar 2 Collection | धुरंधर चित्रपटानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून धडाकेबाज कमाईला सुरुवात केली आहे. 18 मार्च रोजी प्रीव्ह्यू शोसह प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने प्रीव्ह्यू शोमध्ये तब्बल 43 कोटींची ऐतिहासिक कमाई केली. देशातील चौथ्या सर्वाधिक ओपनिंग डेचा विक्रम स्वतःच्या नावे करत रणवीर सिंहच्या या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाचे एकूण वर्ल्डवाईड कलेक्शन आता 269.39 कोटी रुपयांवर पोहोचले असून त्याची घोडदौड सुरूच आहे.

ओपनिंग डेला 100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा वेग दुसऱ्या दिवशी थोडा मंदावला असला तरी त्याने 80.72 कोटी रुपये कमावले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या दिवशी 20125 शोमधून ही कमाई झाली असून पहिल्या दिवसाच्या तुलनेत यात 21.3 टक्क्यांची घट झाली आहे. आदित्य धरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट हिंदीसह 5 भाषांमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे. विकेंडला या चित्रपटाला किती कोटींचा फायदा होतो आणि हा चित्रपट कोणते नवे विक्रम रचतो, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा     :              चाकणकरांसह अनेक मंत्री खरातच्या संपर्कात; संजय राऊत यांचा आरोप

दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे भाषावार विश्लेषण केल्यास, हिंदीतून या चित्रपटाने सर्वाधिक 78.94 कोटींची कमाई केली असून तेलुगुमधून 1.30 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय तामिळमधून 44 लाख, कन्नडमधून 3 लाख आणि मल्याळममधून 1 लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये रणवीर सिंहने भारतीय गुप्तहेर हमजा अली मझारीची मुख्य भूमिका साकारली असून त्याचा भूतकाळ जसकिरत सिंह रंगी म्हणून दाखवण्यात आला आहे.

पाकिस्तानी गुंड रहमान डकैतला संपवल्यानंतर हमजा लियारीचा कारभार सांभाळतो आणि आपल्या देशावरील हल्ल्यांचा बदला घेतो. हा उत्कंठावर्धक चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो आणि लवकरच हा चित्रपट नवा इतिहास रचेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या चित्रपटामध्ये राकेश बेदी, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, दानिश पंडोर आणि दानिश इकबाल या सर्वच कलाकारांनी अत्यंत उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button