ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

निळू फुलेंची लेकही मराठी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय

मालिका विश्वातून स्वेच्छा निवृत्ती 

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते निळू फुले. ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली. करारी आवाज व दमदार अभिनय आणि साधं राहणीमान यामुळे त्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं, मराठी सिनेसृष्टीतील जातीवंत कलाकार अशी ओळख असणारे निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेच लाडके निळू फुलेंनी चार दशकांहून अधिक काळ अविरत काम केलं. निळू फुले यांची लेकही मराठी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. गार्गी फुले-थत्ते यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

निळू फुलेंच्या लेकीचा मोठा निर्णय

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या गार्गीने मालिकाविश्वातून रिटायरमेंट घेतल्याचं एका मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे. एका मुलाखती दरम्यान गार्गीने याचा खुलासा केला. गार्गीचा गोड अभिनय आणि तिचाही अभिनयातला अगदी सहज-साधेपणा प्रेक्षकांना नक्कीच भावला. गार्गीने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून गार्गीला घराघरात प्रसिद्धी मिळाली. मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली.

हेही वाचा  :  ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान 

मालिकाविश्वातून निवृत्ती

या मालिकेनंतरही गार्गीने ‘राजा राणीची गं जोडी, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, या लोकप्रिय मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. याशिवाय तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. तसेच ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ या चित्रपटातही तिने काम केलं आहे. पण आता मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेतल्याच्या तिच्या या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

“मी 10 वर्षे कुटुंबापासून खूप लांब….”

असा निर्णय घेण्यामागे गार्गीने कारण सांगताना ती म्हणाली की, “खरं सांगायचं तर मी, मालिकाविश्वातून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे. कारण मी मालिकाविश्वात 10 वर्ष काम केलं आहे. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी 10 वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिलेय. खरं सांगायचं तर, कलाकारांसाठी मालिकेचं शेड्युल खूप विचित्र झालं आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिकाविश्वात काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्यच्या असो किंवा इतर, तर खूप त्रास होतो.” गार्गीने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

गार्गी अभिनयाशिवाय राजकारणातही सक्रिय आहे. तसंच आता तिने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. गार्गीने स्वतःचं Solitude Holiday नावाचं ट्रॅव्हलिंग अ‍ॅपही लॉंच केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आवडत्या कलाकारांसोबत चाहत्यांना देश-विदेशात फिरायला मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button